घातक परिवर्तन(भाग-८)
भारतीय समाजात जी
काही परिवर्तन होत आहेत त्यामधील एक घातक परिवर्तन म्हणजे धंदा. वर्तमान समाजात
पैसा हा देव ते सर्वस्व पासून खूप काही आहे अशी विचारधारा निर्माण होत त्या
प्रकारचा संस्कार ते संस्कृती निर्माण होणे.
आज प्रत्येक
क्षेत्राला बाजारू स्वरूप प्राप्त होत आहे. डॉक्टर असो की खेळाडू पासून अनेक
सामाजिक-धार्मिक संस्था या सगळ्यांचे प्राथमिक ध्येय म्हणजे पैसा मिळवणे तसेच
प्रसंगी त्यासाठी कोणत्याही थराला जाणे. वर्तमान समाजात मुखवट्याने वावरणारे अनेक
आहेत पण त्यांचा वास्तविक चेहरा उघडा पडल्या वाचून राहत नाही.
वर्तमान समाजाची
अवस्था थोडक्यात सांगायची झाली तर लक्ष्मी स्वरूप अर्था मागे धावताना शारदा स्वरूप
अर्थाला दुर्लक्षित करणे. शारदा स्वरूप अर्थाला दुर्लक्षित करून माणूस धावतो
किंबहुना शारदा स्वरूप अर्थ(ज्ञान) दुर्लक्षित करण्यामुळेच तो धावतो आहे.
ज्ञान अभावी साधन
हेच ध्येय झाले. पैसा हे जीवनाचे एक साधन आहे मात्र माणूस पैसा मिळवण्यासाठी साधना
करीत आहे. पैसा असेल तर खूप काही मिळते असा समज प्रचलित आहे पण पैसा फक्त तेच देतो
जे बाजारात विकत मिळते.
पैसा मनःशांती किंवा
समाधान देऊ शकतो का? पैसा निर्भयता प्रदान करू शकतो का? पैसा देऊन प्रेम खरेदी
करता येते का? थोडक्यात पैसा मानसिक गरजांची ती देखील मुलभूत गरजांची पूर्तता
करण्यास सक्षम आहे का?
काही व्यक्ती पैसा
म्हणजे सुरक्षा ते प्रतिष्ठा मानतात पण पैसा मृत्यू किंवा अपमान टाळण्यास समर्थ
आहे का? पैसा काय देऊ शकतो हे अनेकांना ज्ञात आहे पण काय देऊ शकत नाही याचा कधी
विचार केला का?
पैसा मिळतो पण
त्यासाठी काही किंमत मोजावी लागते करण काही मिळवताना काही गमवावे लागते पण माणूस
कमवणे आणि गमवणे यांना भिन्न मानतो मात्र यामधील परस्पर सापेक्षता असो की पूरकता
याचे ज्ञान आहे का? वर्तमान समाजात ज्ञान कमी पण विकत मिळणारी माहिती अधिक तसेच
मुळात शिक्षण घेताना ते पैसा मिळवण्यासाठीच घेतले जाते तर ज्ञान मिळणार कसे?
सोबतीला मी म्हणजे सर्वज्ञ असा अहंकार दत्त गैरसमज आहे.
पैसा सार्थक समजत तो
मिळवण्यासाठी प्रसंगी माणूस लाचार तो लोचट पासून भ्रष्ट होतो पण सार्थक मधील
निरर्थक किंवा योग्य मधील अयोग्य पाहण्याची दृष्टी असो की आत्मसात करणारे आकलन
यांचा अभाव दुर्लक्षित होतो यामुळे समाजात भ्रष्टाचार वाढत आहे.
पैसा म्हणजे नेमके
काय? तर पाहणारी दृष्टी व आत्मसात करणारे आकलन परत्वे मुल्यांकन करणारा स्वभाव
निर्माण करणार ती परिभाषा. पैशाला मूल्य आहे पण जीवन किंवा जीवनातील
समाधान-शांतता, प्रेम हे अमुल्य आहेत.
आपल्या जीवनात
मुल्यवान काय? पैसा की जीवन? पैसा की आत्मिक समाधान-शांतता-प्रेम? थोडा विचार करून
पाहावा मात्र समज मधील गैरसमज असो की सार्थक मधील निरर्थक याला दुर्लक्षित करून
एकांगी दृष्टीने अभ्यास असो की निर्णय घेऊ नये ही विनंती. अखेर अर्थ मागील धाव
वास्तवात अनर्थ मागील धाव आहे कारण अर्था विना अनर्थ नाही. वर्तमान समाजात जो काही
अनर्थ त्यामागे अर्थ आहे तसेच अर्था मागे अनर्थ देखील आहे.
Comments
Post a Comment