भिन्नता मागील एकता


दहशदवाद, नक्षलवाद, हिंसाचार हे समस्त प्राथमिक दृष्टीने भिन्न आहेत. तसेच काही व्यक्ती व्यक्ती यांचा भिन्नता आधारित मागोवा घेतात मात्र सोईस्कररीत्या एकतेचा आधार देखील घेतात. दहशदवाद तसेच नक्षलवाद भिन्न मात्र समस्त दहशदवादी व नक्षलवादी एक समजण्यात येतात. अर्थात ज्याचा त्याचा दृष्टीकोन तसे आकलन. प्रत्येक व्यक्ती स्वतंत्र आहे. आपण आपल्या तसेच इतरांच्या स्वतंत्रतेचा आदर करावा.
अभ्यास करण्याच्या दोन प्रमुख पद्धती आहेत. एक भिन्नता प्रधान तर दुसरी एकता प्रधान. सामान्यतः भिन्नता प्रधान पद्धतीचा व्यापक प्रमाणात अवलंब होतो. दहशतवाद, नक्षलवाद, हिंसाचार या सगळ्यात असणारी भिन्नता अनेकांना माहित आहे मात्र एकता किती जणांना माहित आहे?
दहशतवाद, नक्षलवाद, हिंसाचार या सगळ्यांचा निर्माता माणूस आहे. या सगळ्या मानवाच्या प्रतिक्रिया आहेत( काही व्यक्ती क्रिया समजतात). या सगळ्यात मानवी स्वभावाची निर्णायक भूमिका आहे. या सगळ्यात मानव स्वतःच्या मुलभूत मर्यादा उल्लंघन करतो. या सगळ्यात हुकुमशाही आहे. या सगळ्यात हिंसा आहे. शोधणार तितक्या एकता मिळणार आहेत.
काही व्यक्ती हिंसा व दहशतवाद भिन्न मानतात कारण हिंसेची परिभाषा. माझ्या दृष्टी व आकलन क्षमता नुसार एखाद्याला हीन समजणे किंवा एखाद्याचे मुल्यांकन करणे म्हणजे हिंसा. हिनसा-हीन समजणे म्हणजे हिंसा.
या सृष्टीतील कोणताही मानव दृष्टी व आकलन संदर्भात परिपूर्ण नाही. तसेच दृष्टी नुसार आकलन तसेच सृष्टी बदलते. मानवाची दृष्टी अपूर्ण पाहते त्यामधून अपूर्ण आकलन होते दुसऱ्या शब्दात संभ्रम निर्माण करते. मानव या संभ्रमाला सत्य मानतो व गल्लत करतो. मानव आकलन निर्मित संकल्पनांना सत्य मानतो तसेच त्यानुसार आचरण करतो. मुल्यांकन, तुलना, आपला-परका, मित्र-शत्रू, माझे-तुझे या समस्त आकलन संकल्पना आहेत.
प्रत्येकाला स्वतःचा दृष्टीकोन व आकलन आहे त्यानुसार तो आचरण करतो थोडक्यात तो स्वतःच्या स्वभानुसार वागतो, बोलतो, करतो तसेच याच्या वागण्या- बोलण्या- करण्या ला पाहणारा तसेच समजणारा स्वतःच्या स्वभावानुसार समजतो- आकलन करतो. पाहणारा तसेच समजून घेणारा संकुचित दृष्टीने पाहतो की व्यापक दृष्टीने पाहतो त्यानुसार अर्थ बदलतो. आचरण करणाऱ्या व्यक्तीचा दृष्टीकोन व समजून घेणाऱ्या व्यक्तीचा दृष्टीकोन यामध्ये तफावत असता गल्लत घडते. पाहणार-समजून घेणारा वास्तविक अर्थ प्रदान करतो. तसेच इतरांच्या कृतीचे वर्गीकरण- मुल्यांकन करतो वर याला इतरांचे सत्य मानतो. मानवाला स्वतःची दृष्टी व आकलन मर्यादा संदर्भात अज्ञान असल्याने हा प्रकार घडतो.
इतरांची पात्रता-लायकी ठरवणे म्हणजे मुल्यांकन करणे यामागे मानवाचे स्वाभाविक अज्ञान आहे. हिंसा हा मानवाचा उपजत स्वभाव आहे मात्र यासंदर्भात जाणीव होण्यासाठी स्वतःचे परीक्षण करण्याची गरज आहे. दुसरा व्यक्ती काय करतो किंवा त्याने काय करावे यापेक्षा आपण कसे पाहतो तसेच काय समजतो-करतो याला अनन्य साधारण महत्व आहे. मात्र मानव स्वतःच्या डोळ्यातील मुसळ न पाहता इतरांच्या डोळ्यातील कुसळ शोधण्याचा प्रयन्त करतो प्रसंगी नसलेले कुसळ असण्याचा दावा करतो हीच हिंसा आहे.
दहशतवाद असो की नक्षलवाद यामध्ये दुसऱ्यांचे निर्णायक होण्याचा- मुल्यांकन करण्याचा प्रकार आहे. इतरांना जगण्यास अपात्र ठरवण्यात येते. सोबत सूड, घृणा, द्वेष, तिरस्कार आहेच. हिंसाचारात देखील हाच प्रकार आहे. थोडक्यात कृती मागील स्वाभाविकता-प्रवृत्ती पाहता, एकता निदर्शनास येते. दुसऱ्या शब्दात इतरांच्या स्वातंत्र्यावर घाला घालणे म्हणजे हिंसा, दहशतवाद, नक्षलवाद आहे. 

Comments

Popular posts from this blog

सरड्याची धाव कुंपणापर्यंत

पेरावे तसे उगवते

अंथरूण पाहून पाय पसरणे