या व्यसनांचे काय?


व्यसन म्हणताच दारू, सिगारेट, तंबाखू, गुटखा नजरे समोर येतात. अर्थात काही अमली पदार्थ ते औषध यांचे देखील व्यसन काही व्यक्तींना माहित आहेत. मात्र अनेक व्यसना पासून समाज अनभिज्ञ देखील आहे. साधारणतः नशेची अनुभूती म्हणजे व्यसन करणे असे समजण्यात येते. व्यसन म्हणजे नेमके काय? तर एखादी गोष्ट वारंवार करण्याची सवय तसेच या सवयी सोबत असणारी सशर्तता.
आपण एखादी गोष्ट करतोच त्यावेळी बरे वाटते अशी सवय म्हणजे व्यसन आहे. एखादी गोष्ट करण्याविना बरे वाटत नाही अशी सवय म्हणजे व्यसन आहे. एखाद्या सवयीच्या आहारी जाणे म्हणजे व्यसन आहे. एखादी गोष्ट केल्याविना करमत नाही, जमत नाही, ताजे-तवाने वा तरतरीत पणा जाणवत नाही म्हणजे व्यसन आहे. आपल्याला असणारे व्यसन आपणास कळते किंवा आपण त्याला व्यसन मानतो असा नियम नाही.
आपण आपल्या आचरणाचा अभ्यास करून पाहावा म्हणजे सवय तसेच सशर्तता लक्षात येणार आहे. सध्या समाजात मनोरंजन, बाहेरचे खाद्य पदार्थ खाने, सामाजिक सांकेतिक स्थळांना भेट देणे सारखी काही व्यसन वाढत आहेत. सोबत काम करणे, पैसा मिळवणे, प्रतिष्ठा मिळवणे, पद मिळवणे- सत्ता मिळवणे यासारखी व्यसनाधीनता वाढत आहे.
मनोरंजनाचे व्यसन सहज लक्षात येत नाही. मुळात याला मनोरंजन समजण्यात येते मात्र मनोरंजन अभावी करमत नाही ते अस्वस्था जाणवते. विशेषतः ज्या गृहिणी घरकाम करतात त्यांना फावला वेळ मिळतो त्यावेळी मनोरंजनाचा आधार घेतला जातो पण या मनोरंजनाला मर्यादा आहेत का? सध्या वाहिन्या तसेच त्यावरील धारवाईक यांचे प्रमाण लक्षणीय आहे. तसेच रात्री व दिवसा असे दुहेरी प्रक्षेपण यामुळे रात्री वेगळ्या व दिवसा वेगळ्या धारवाईक पाहण्यात येतात. यांच्या गप्पा मध्ये धारवाईक हाच विषय-आशय असतो. रविवारी या गृहिणींना करमत नाही तसेच यांची चीड-चीड होते, अस्वस्थ वाटते.
काही व्यक्तींना पैसा कमावण्याचे व्यसन आहे. मात्र याला पैसा कमावणे समजले जाते. पैसा कमावणे ज्याची सवय त्याला ज्यादिवशी पैसा मिळत नाही त्यादिवशी अस्वस्थता जाणवते, करमत नाही, चीडचीड होते, तणाव जाणवतो मात्र याचे कारण समजते, उमगते असा नियम नाही किंवा पैसा कमावणे हे व्यसन असल्याचे उमगते असा नियम नाही.
काही व्यक्तींना काम करण्याचे व्यसन असते मात्र काम करणे समजण्यात येते. मात्र काम नसेल तर अस्वस्थता जाणवते, चीडचीड होते. काही व्यक्तींन सकाळी उठल्या नंतर पेपर वाचनाची सवय असते तसेच जर पेपर वाचनास नाही मिळाला तर पोट साफ होत नाही किंवा पोट साफ करण्याची भावना-दबाव जाणवत नाही. प्रत्येक मानवाची जडण-घडण तशी सवय तसेच सवय सोबत सशार्तता.
कोणत्या व्यक्तीला कोणती सवय जडेल तसेच त्याचे रुपांतरण व्यसनात होईल याचा निश्चित नियम नाही. मात्र सवय सोबत सशर्तता म्हणजे व्यसन आहे. काही व्यक्ती व्यसनांचे चांगले-वाईट, फायदा- तोटा असे वर्गीकरण करतात. मात्र व्यसन हे व्यसन आहे त्याचे परिणाम तसेच दुष्परिणाम देखील आहेत फक्त ते कधी समजतात-जाणवतात तर कधी ना समजतात ना जाणवतात.
व्यसना पासून बचाव करायचा असेल तर प्रत्येक सवयीला थोडी विश्रांती द्यावी. यामुळे सशर्तता खंडीत होत सवय फक्त सवय राहते. थोडे स्वतःचे परीक्षण करून प्रत्यय घ्यावा ही विनंती.

Comments

Popular posts from this blog

सरड्याची धाव कुंपणापर्यंत

अंथरूण पाहून पाय पसरणे

पेरावे तसे उगवते