दगडातील देव दिसतो पण माणसातील देवाचे काय?


जगात देव आहे की नाही या प्रश्नाच्या फंदात न पडता क्षणभर ग्राह्य धरून विचार करून पाहावा ही विनंती. जगात देव आहे हे ग्राह्य धरता तो कुठे आहे? असा प्रश्न निर्माण होणे स्वाभाविक आहे. धर्मशात्र अनुसार देव हा जळी-स्थळी-काष्ठी-पाषाणी आहे. कोणत्याही दैववादी माणसाला विचारा तो याच प्रकारचे उत्तर देणार आहे.
आज जगभरात सर्वात श्रीमंत कोण? तर देव कारण देवाला देणारे अनेक भाविक दान करतात अर्थात आवळा देत कोहळा घेणारा आतबट्याचा व्यवहार करण्यात येतो हा भाग वेगळा. यादेवाच्या दानपेटीत अमुक-तमुक रक्कम दान, सोने, हिरे.... दान करण्यात आल्याचे नेहमी ऐकण्यात, वाचनात तसेच पाहण्यात येते. तसेच अनेक साधू-संत यांची संस्थाने पाहता माणूस देवाला ते देखील दगडातील देवाला खूप काही देतो. अर्थात देव सगुण-निर्गुण असो दगडाचा आधार घ्यावा लागतो.
थोडक्यात मानवाला दगडाला एक आकार देत त्याला देव मानत माणूस वास्तवात दगडाला देवपण देतो तसेच माझा तो देव व तुझा तो दगड करण्यात येतो. मात्र या सगळ्यात गंमत म्हणजे जो माणूस जळी-स्थळी-कष्टी-पाषाणी देव असल्याचे सांगतो त्याला माणसातील देव दिसतो का? त्याला पर्यावरणातील देव दिसतो का? स्वतः मुलगा असो की पत्नी अथवा आई-वडील, भाऊ-बहिण यांच्या मध्ये देव दिसतो का? इतर समाज-माणसातील देव फार लांब आहे पण घरातील माणसांच्यात देव दिसतो का?
आपण स्वतःच्या घरातील लोकांना आदर तरी प्रदान करतो का? थोडा स्वतःच्या आचरणाचा अभ्यास करून पाहावा. आज समाजातील सामान्य माणूस अन्नाला महाग असताना दगडाच्या देवाला मिष्टान्नाचे भोजन तेच काही देवांना बकरे-कोंबडे? जसा माणूस तसा त्याचा देव तसेच देवाचा आहार.
देवाला बकऱ्याचा असो की कोंबड्याचा बळी देताना त्या बकऱ्या-कोंबड्यात असणाऱ्या देवाचे काय? एकीकडे दगडाला किंवा देवाला काही असो पण एका निर्जीवाला आहार दिला जातो पण सजीव उपाशी राहतो तसेच त्याचा भूकबळी जातो याकडे लक्ष दिले जात नाही किंवा त्याला अन्न देण्याचा प्रयन्त केला जात नाही. अर्थात काही देवस्थानात अन्नछत्र चालवण्यात येतात पण त्या देवाला येणाऱ्या भाविकांसाठीच असते. एकीकडे देव तो देखील निर्जीव हा तुपाशी मात्र माणूस असो की भक्त उपाशी?
अनेक देवांना भरजरी वस्त्रांनी सजवण्यात येते मात्र अनेक व्यक्तींना शरीर असो की शरीराची लाज राखण्या इतके देखील कापड मिळत नाही, शरीर संरक्षण ही खूप लांबची गोष्ट आहे. निर्जीव त्याला वस्त्र पण सजीव मात्र निर्वस्त्र?
काही देवतांना दुध-दही-तूप यांचा अभिषेक करण्यात येतो मात्र सामान्य माणूस यापासून वंचित राहतो. तेच काही देवतांना सुवर्ण मुकुट ते भिंती सोन्या-चांदीने मढवण्यात येतात तसेच त्या ठिकाणी कडेकोट सुरक्षा असते पण सामान्य माणसाला ना रक्षा ना संरक्षण? देवाला ते देखील निर्जीव देवाला राहण्यासाठी मंदिर-मस्जिद-गुरुद्वारा-चर्च आहेत पण सामान्य माणूस उघड्यावर म्हणजे त्याला फक्त आभाळाची चादर?
थोडा विचार करून पहा आम्ही एक माणूस म्हणून जन्म घेतला तसेच एक निर्जीव दगडाला देव मानत त्याची पूजा-अर्चना करताना मात्र सामान्य माणसातील असो की प्राणी-मात्रा मधील देव दिसतो का? आम्ही या सजीव देवांना काही देतो का?  

Comments

Popular posts from this blog

सरड्याची धाव कुंपणापर्यंत

अंथरूण पाहून पाय पसरणे

पेरावे तसे उगवते