चमत्कार-योगायोग की शास्त्र?
काल लिहिल्या
प्रमाणे काही व्यक्तींच्या मनात ज्योतिष शास्त्र तसेच होमियोपँथी यांच्यातील
शास्त्रोक्तपणा-वैज्ञानिकता यासंदर्भात काही शंका आहेत किंवा
शास्त्रोक्तता-वैज्ञानिकता त्यांच्या आकलन कक्षेच्या बाहेर आहे परंतु मानवी स्वभावानुसार
तो व्यक्तिगत अज्ञान-मर्यादा न पाहता तर्काने खंडन-मुंडण करण्याचा प्रयन्त करणार
यामध्ये शंका नाही यामुळेच मी माझ्या जीवनातील काही अनुभव मांडत आहे.
प्रथम ज्योतिष
शास्त्राचा अनुभव. मी माझ्या जीवनाच्या एका वळणावर प्रेमविवाह करणार होते. माझ्या
एका जिवलग मित्राने त्याच्या वडिलांना दोघांच्या कुंडली दाखवण्यास सांगितल्या कारण
काका स्वतः डॉक्टर तसेच ज्योतिष शास्त्राचे गाढे अभ्यासक आहेत. मी काकांना कुंडली
दाखवली त्यावेळी काकांनी मला स्पष्ट शब्दात सांगितले की हा विवाह होणार नाही.
त्यावेळी मी हसलो कारण कोणत्याही क्षणी मी विवाह करू शकतो अशी परिस्थिती होती.
माझ्या मित्राच्या भावाने देखील कुंडली पहिली. कुंडली पाहताच त्याने न पाहिलेल्या
मुलीचे वर्णन केले तसेच आणखीन एका जाणकाराला कुंडली दाखवण्याचा सल्ला दिला.
आम्ही दोघे एका
प्रख्यात जाणकाराकडे गेलो त्याने काकांच्या प्रमाणे उत्तर दिले सोबत मी भविष्यात
लेखक होण्याचे सुचोवत केले. मी पुन्हा हसलो कारण विवाहाची परिस्तिथी तसेच मला साधे
पत्र लिहिता येत नव्हते. काका तसेच प्रख्यात जाणकार या दोघांनी माझ्या भावी
पत्नीचे वर्णन देखील केले होते ते त्या मुली सोबत जुळत नव्हते. यादोन्ही
अभ्यासकांच्या भविष्य वाणीचा प्रत्यय मला दोन महिन्यात मिळाला. माझा प्रेमविवाह
झाला नाही.
मी नंतर ज्योतिष
शास्त्राचा अभ्यास सुरु केला पण गती नव्हती तसेच काही मार्गदर्शन घेण्यासाठी
श्री.धुंडीराज पाठक यांच्या कडे गेल्या नंतर त्यांनी प्रथम माझी कुंडली पहिली व
सरळ सल्ला दिला तो म्हणजे मला या अभ्यासात गती मिळणार नाही तसेच मी लिखाण करावे.
मला पुन्हा हसू आले कारण लिखाण म्हणजे अशक्य तसेच तो माझा पिंड नाही असा माझा समज.
मात्र दोन महिन्यात तो समज गैरसमज असल्याचा प्रत्यय आला. माझे लिखाण सुरु झाले ते
आजही अव्याहत पणे सुरु आहे. मी काही प्रसिद्ध किंवा प्रतिष्ठित-प्रस्थापित लेखक
नाही पण माझी एक भिन्न शैली आहे. आता चार पुस्तक प्रकाशन प्रक्रिया मध्ये आहेत.
काका तसेच प्रख्यात
अभ्यासक यांनी वर्णन केल्या सारखीच पत्नी मला मिळाली. या समस्त अभ्यासकांनी
सांगितल्या प्रमाणेच मी प्रेमविवाह करण्यास असमर्थ ठरलो तसेच लेखक झालो यामध्ये चमत्कार-योगायोग
की शास्त्र आहे? या प्रश्नाचे उत्तर ज्याने त्याने शोधावे.
मी शिक्षणाने एक
होमियोपॅथ आहे. मी वैद्यकीय व्यवसाय करीत नाही पण आवड तसेच अभ्यास असल्याने मोफत
उपचार करतो फक्त काही वेगळे-आव्हानात्मक काम केल्याचे समाधान मिळेल या वर्गवारीत
मोडणाऱ्या रुग्णांना हाताळतो.
रुग्ण-१ तीन वर्षा
पासून भूतकाळात जगत होता. चाळीस वर्षापूर्वीचे जीवन वर्तमान काळात जगत होता.
प्रख्यात मानसोपचार तज्ञांचा उपचार दोन वर्षापासून सुरु होता मात्र त्यामुळे पोट
साफ होत नव्हते तसेच अपेक्षित असणारा उपचारांचा प्रतिसाद मिळत नव्हता अखेर
ठाण्याला भरती करावी असा मानसोपचार तज्ञांनी सल्ला दिला. मी औषध सुरु केले तसे
चोवीस तासात माणूस वर्तमान काळात आला.
रुग्ण-२ काही
दिवसापासून संपूर्ण अंगाला खाज सुटणे ही तक्रार संपूर्ण माहिती घेतली त्यावेळी
मधुमेह होता तसेच रक्तामधील साखर ६००+ होती डॉक्टरांनी इन्सुलीन घेण्यास सांगितले
पण रुग्णाने कंटाळा केला. उपचार सुरु केले नंतर महिन्याभरात साखर सामान्य पातळीला.
रुग्ण-३ चार वर्षा
पासून त्वचा रोग तज्ञांचे उपचार सुरु कारण चेहरा-हातपाय यावर डाग उठणे-खाज सुटणे
असा प्रकार सुरु होता मात्र जोपर्यंत उपचार सुरु तो पर्यंत खाज कमी गोळ्या चुकल्या
की सुरु याला पेशंट वैतागला होता. या रुग्णाला फक्त चार गोळ्या एकदाच चाघळण्यास
दिल्या त्यानंतर आज तागायत खाज नाही की कोणता डाग नाही.
याप्रकारच्या अनेक
घटना आहेत जर होमियोपँथी मध्ये शास्त्र नाही किंवा वैज्ञानिकता नाही तर यासमस्त
रुग्णांना जो काही आराम मिळाला तो चमत्कार-योगायोग आहे का? प्रत्येक चमत्कार असो
की योगायोग असो त्यामागे देखील शास्त्र असते फक्त त्याची उकल मानवाला करता येते
किंवा नाही हा मानवी मर्यादांचा एक भाग आहे पण मर्यादा पाहणार किंवा पालन करणार तो
माणूस कसला?
निर्णय आपल्या हाती
आहे. आपण शात्रोक्तात नाकारावी किंवा ती शोधण्याचा प्रयत्न करावा. अखेर जसा
संस्कार तसा दृष्टीकोन व आकलन त्यापरत्वे आचरण.
sir maje ek Q ahe? sir maje age 22 ahe maji hight 5.2 ahe and mala kiman 2 inch hight increase karaychi ahe...tari kahi salla asel kiva medicin asel tar krupaya sanga...apalya uttarachi vat pahat ahe...
ReplyDelete