वाद
वर्तमान काळात मानवी
समूहात अनेक वाद आहेत. वाद या शब्दाचे अनेक अर्थ तसेच अनेक अर्थानी एक शब्द आहे.
वाद म्हणजे विचारधारा, मतप्रवाह तसेच अभिव्यक्ती देखील आहे. वाद विना संवाद किंवा
विवाद होत नाही. वादाचे स्वरूप कोणतेही असो मात्र वाद ही मानवी स्वभावाची निष्पत्ती
आहे. काही व्यक्ती वादाला मानवी आकलन-प्रज्ञा यांची निष्पत्ती मानतात परंतु मुळात
आकलन मागे समग्र स्वभाव आहे दुसऱ्या शब्दात समग्र व्यक्तिमत्व आहे.
वर्तमान समाजात
प्रत्येक वाद भिन्न-भिन्न समजण्यात येतो म्हणजे हा वाद वेगळा तर तो वाद वेगळा
करण्यात येते. प्रत्येक वादाचा अभ्यास करणारे तज्ञ देखील वेगवेगळे आहेत. वर्तमान
समाजावरील विज्ञानाचा प्रभाव पाहता प्रत्येक गोष्ट भिन्न समजणे यामध्ये आश्चर्य
नाही. भिन्नता ही एकांगी सापेक्षता आहे. प्रत्येक भिन्नता मागे एकता आहे. भिन्नता
समजण्या-जाणवण्यासाठी एकता तसेच एकता समजण्या-जाणवण्यासाठी भिन्नता आवश्यक आहे.
ज्याची त्याची जडण-घडण तसा स्वभाव त्याप्रमाणे आकलन. आकलन तसे आचरण व अभिव्यक्ती.
एकता योग्य की
भिन्नता योग्य? दोन्ही योग्य तसेच अयोग्य देखील आहेत कारण एकमेकाविना
परिपूर्ण-समग्र होत नाहीत मात्र यापैकी एकच योग्य असा अट्टाहास करता जे निर्माण
होणार ते म्हणजे वाद आहे. ज्या ठिकाणी अट्टाहास त्याठिकाणी अज्ञान व अहंकार आहे.
दुसऱ्या शब्दात मर्यादा संदर्भात भान नाही. आपले आकलन अपरीपूर्ण असल्याचे भान नसेल
त्याठिकाणी अट्टाहास करण्यात येतो. विशेष म्हणजे योग्य काय यासाठी अट्टाहास नसतो
तर मी योग्य यासाठी अट्टाहास असतो.
जगभरातील समस्त
अज्ञानी अट्टाहास करतात यामुळे कोणत्याही संवादाचा विवाद होतो. वादात
समन्वय-संतुलन असेल तर संवाद अन्यथा विवाद होतो. समन्वय व संतुलन खंडीत होते कारण
विरोध. एक प्रयोग करून पहा म्हणजे प्रत्यय मिळणार आहे. कोणत्याही ठिकाणी चर्चा
करताना जो वक्ता आहे त्याला कुठेही अडथळा निर्माण करू नका. त्याचा मताला कोणत्याही
प्रकारचा विरोध करू नका म्हणजे संवाद होणार आहे. तेच प्रत्येक मताचे खंडन, विरोध
करून पहा विवाद होणार आहे.
संवादाचा विवाद होतो
त्याठिकाणी अट्टाहास आहे. जगभरातील समस्त विवाद पहा त्याठिकाणी माझे मत योग्यच
तसेच तुझे मत चुकीचे असा अट्टाहास असतो. कोणताही विचार अथवा मत प्रवाह हा योग्य
तसेच अयोग्य आहे. मात्र मानव एकांगी पाहतो तसेच एकांगी आकलन करतो मात्र त्याला
समग्र समजतो इथे खरी गल्लत घडते.
जगभरातील कोणताही
वाद म्हणजे विचारधारा-मतप्रवाह हे एका दृष्टीने योग्य आहेत त्याच प्रमाणे अयोग्य
देखील आहेत कारण योग्य तसेच अयोग्य या निखळ आकलन संकल्पना आहेत. मात्र प्रत्येक
विचारधारेचे समर्थक स्वतःची विचारधाराच योग्य व सर्वोत्तम असण्याचा दावा करतात.
अर्थात जो अज्ञानी व अहंकारी तोच दावा करतो. मी योग्य तसेच सर्वोत्तम यासाठी माझी
विचारधारा किंवा मी ज्या विचारधारेला मानतो ती विचारधाराच योग्य व सर्वोत्तम.
याठिकाणी अहंकार विचारधारे समवेत जोडला जातो यामुळे विचारधारेचे, मताचे अस्तित्व
हेच माझे अस्तित्व यामुळे मानव आक्रमक, आवेशग्रस्त होतो.
जगभरातील कोणताही
वादी पहा म्हणजे वास्तवाचा प्रत्यय मिळणार आहे. इकडे-तिकडे पाहण्याची गरज नाही
फक्त स्वतःच्या अंतरंगात डोकावण्याचा प्रयन्त करून पाहावा. आपण एका मताचे समर्थन
करताना त्याविरुद्ध मताचे खंडन करतो का? बाकी सुज्ञास जास्त सांगण्याची गरज नाही.
Comments
Post a Comment