समर्थक आणि विरोधक
जगभरात अनेक
प्रकारच्या विचारधारा, मत प्रवाह, राजकीय पक्ष आहेत. प्रत्येक विचारधारा असो की मत
अथवा राजकीय पक्ष या सगळ्यांना काही समर्थक तसेच विरोधक आहेत. सामान्यतः समर्थक व
विरोधक असे दोन भिन्न पक्ष समजण्यात येतात मात्र समर्थक हाच विरोधक आहे तसेच
विरोधक हा समर्थक आहे. समर्थक हा अप्रत्यक्ष विरोधक आहे तसेच विरोधक हा अप्रत्यक्ष
समर्थक आहे.
माणूस एका विशिष्ट
मताचे, विचारधारेचे अथवा राजकीय पक्षाचे समर्थन करतो त्यावेळी दुसऱ्या
विरुद्धार्थी मताचा, विचारधारेचा, राजकीय पक्षाचा विरोध करतो. कोणत्या व्यक्तीने,
कोणत्या मताचे, विचारधारेचे अथवा राजकीय पक्षाचे समर्थन वा विरोध करावा यासंदर्भात
निर्णय घेण्यास प्रत्येक व्यक्ती स्वतंत्र आहे मात्र समर्थक तसेच विरोधक व्यक्ती
एकमेकांच्या व्यक्ती स्वातंत्र्यावर सहजतेने गदा फिरवण्याचा प्रयन्त करतात कारण
अज्ञान.
समर्थक व विरोधक
व्यक्तिगत अज्ञान न पाहता आपसात संघर्ष-कलह-विवाद करतात. याठिकाणी माझ्या तो
बाब्या तसेच तुझे ते कार्टे होणे स्वाभाविक आहे. कोणताही व्यक्ती योग्य त्याचे
समर्थन करतो की त्याला जे योग्य वाटते-समजते त्याचे समर्थन करतो हा एक भाग आहे.
तसेच योग्य मधील अयोग्य पाहण्याची क्षमता आहे का? हा दुसरा महत्वाचा भाग आहे.
कोणताही समर्थक हा त्याला जे योग्य वाटते त्याचेच समर्थन करतो तसेच त्या योग्य
मधील अयोग्य पाहण्याची क्षमता त्याच्या ठायी नसते यामुळेच तो समर्थक असतो.
समाजात एक वर्ग
स्वतःला आस्तिक मानतो तेच एक वर्ग नास्तिक मानतो. थोडक्यात एक वर्ग धर्माचे समर्थन
करतो तर दुसरा वर्ग विज्ञानाचे समर्थन करतो. धर्म समर्थक विज्ञानाचा विरोध करतो
तेच विज्ञान समर्थक धर्माचा विरोध करतो. धर्म समर्थक व विज्ञान समर्थक हे वास्तवात
अज्ञानी आहेत यामुळेच समर्थक व विरोधक आहेत. कोणतही धर्म व विज्ञान ज्ञानी हा
समर्थक अथवा विरोधक नसतो कारण मर्यादा संदर्भातील जाण व भान. कोणताही ज्ञानी धर्म
असो की विज्ञान यासंदर्भातील स्वतःचे अज्ञान जाणतो.
जो व्यक्ती स्वतःचे
अज्ञान जाणतो तोच ज्ञानी समाजाला जातो तेच जो व्यक्ती स्वतःचे ज्ञान जाणतो तो
अज्ञानी आहे. जो ज्ञानी आहे तो स्वतःचे अज्ञान दूर करण्याचा प्रयन्त करताना
ज्ञानोपासना करतो तेच जो स्वतःचे ज्ञान पाहतो तो इतरांचे अज्ञान तपासण्याचा तसेच
दूर करण्याचा प्रयन्त करतो. ज्ञानी स्वतःचे मत मांडतो तेच अज्ञानी स्वतःच्या मताचा
अट्टाहास मांडतो. कोणताही ज्ञानी स्पष्टीकरण मागत नाही तर शोधण्याचा प्रयन्त करतो
तेच अज्ञानी स्पष्टीकरण मागत फिरतो.
धर्म समर्थक असो की
विज्ञान समर्थक असो यांची समस्त भिस्त उसन्या व उधार माहितीवर आधारित असते यामुळे
एका पातळी नंतर यांची माहिती व उधार-उसनवारीचे अवसान गळून पडण्यास प्रारंभ होतो
याठिकाणी माणूस हमारी-तुमरी सुरु करतो. माणूस स्वतःचे अपूर्ण ज्ञान पाहत नाही यामुळे
गल्लत करतो तसेच स्वतःच्या मुलभूत त्रूटी व अज्ञान यांचा मागोवा न घेता इतरांच्या
त्रूटी व अज्ञानाचा मागोवा घेण्याचा प्रयन्त करतो. प्रसंगी अज्ञानी माणूस ज्ञानी
माणसाच्या ज्ञाना संदर्भात प्रश्नचिन्ह निर्माण करतो. जगात एक मोठी गंमत म्हणा की
विटंबना अथवा विडंबन म्हणा आहे. जगातील प्रत्येक ज्ञानी माणसाला स्वतःचे ज्ञान सिद्ध
करावे लागते ते देखील अज्ञानी माणसा समोर तसेच त्या अज्ञानी माणसाला सुलभतेने आकलन
करता येणार इतक्या सुलभ पद्धतीने सांगावे-मांडावे लागते अन्यथा ज्ञानी मानवाचे
ज्ञान नाकारण्यात येते.
कोणत्याही समर्थकाला
व विरोधकाला पहा तो नाकारण्याचा प्रयन्त करतो कारण स्वतःला परिपूर्ण व सत्य-समग्र
मानतो तसेच त्यापरत्वे इतरांची तपासणी ते निर्णायक होण्याचा प्रयन्त करतो.
थोडक्यात स्वतःचे अपरीपूर्ण माहिती व ज्ञान(अज्ञान) याला आधारभूत मानत परीक्षण
करतो. दुसऱ्या शब्दात दृष्टी तीच सृष्टी मानतो तसेच हेच जगाने मानावे यासाठी
अट्टाहास करतो. मात्र आपण ज्याचे समर्थन अथवा विरोध करतो त्याला समग्र पाहतो किंवा
त्याचे समग्र आकलन करतो का? याची तपासणी करण्याच्या फंदात कोणताही समर्थक अथवा
विरोधक करतो का?
प्रश्नाचे उत्तर
शोधण्यासाठी इकडे-तिकडे पाहण्याची गरज नाही फक्त स्वतःच्या अंतरंगात डोकावून पहा
त्याठीकाणी एक समर्थक-विरोधक तसेच ज्ञानी व अज्ञानी आहे. आपण काय करतो याचा
प्रत्यय घ्यावा म्हणजे समर्थक व विरोधक यांच्या कृतीचा प्रत्यय मिळणार आहे.
प्रत्यय म्हणजे अनुभव आणि अनुभव म्हणजे शहाणपण देणारा गुरु आहे. बाकी सांगण्याची
गरज आहे का?
Comments
Post a Comment