राष्ट्र पुरुष की जात-पात पुरुष?


सध्याचे जे काही सामाजिक वातावरण पाहण्यास मिळते त्यामध्ये राष्ट्र पुरुषांना एका विशिष्ट जात-पात पुरतेच बंदिस्त करण्याचा प्रकार सुरु असल्याचे प्रकर्षाने जाणवते. प्रत्येक जात-पात आपल्या जाती मध्ये झालेल्या राष्ट्र पुरुषांना पकडून ठेवत मालकी हक्क दर्शवण्याचा प्रयन्त करताना त्यांना इतर जाती-धर्मातील राष्ट्र पुरुषांसोबत जणू काही घेणे देणे अथवा सोयरे-सुतक नसावे असे आचरण करीत आहेत.
कोणत्याही सामान्य व्यक्तीला राष्ट्र पुरुष हे पद प्राप्त होत नाही तर ज्यांनी राष्ट्र निर्मिती मध्ये प्रसंगी घरादाराचा त्याग केला तसेच सामाजिक विचारसरणी मध्ये सुधारणा करण्याचा प्रयन्त केला त्यांना राष्ट्र पुरुष समजण्यात येते. राष्ट्र पुरुषांनी कोणत्याही प्रकारचे काम करताना एक ठराविक जात-पात अथवा धर्मासाठी काम केले नाही. प्रसंगी या पुरुषांनी जाती व्यवस्था वर आसूड ओढले आहेत. या पुरुषांनी स्वतःच्या जाती-धर्मातील व्यक्तीवर पुरोगामी संस्कार करण्याचा प्रयन्त केले मात्र वर्तमान काळात त्यांच्या जाती-धर्माच्या लोकांनी त्याच्या नावाचा फायदा घेत सोयीस्कररीत्या राष्ट्र पुरुषांना एकाच जाती-धर्मात बंदिस्त करण्याचा प्रकार सुरु केला आहे.
आंबेडकर असोत की सावरकर, आगरकर असोत की महात्मा फुले, राणी लक्ष्मीबाई असोत की अहिल्यादेवी होळकर, उमाजी नाईक यासारख्यांच्या जयंती असोत की पुण्यतिथी असोत त्यासंदर्भात साजरे करण्यात येणारे कार्यक्रम पहा म्हणजे जात-पात यांनी केलेली कैद लक्षात येणार आहे. जयंती व पुण्यतिथी साजरे करताना अप्रत्याक्षात शक्तीप्रदर्शनाचा खेळ मांडण्यात येत आहे.
आंबेडकर जयंती असो की पुण्यतिथी असो या सगळ्या कार्यक्रमात फक्त आंबेडकरी जनताच असते तसेच समाजातील इतर व्यक्तींना जणू काही आंबेडकरांशी काही घेणेदेणे नाही. असाच प्रकार महात्मा फुले असो की कोणत्याही राष्ट्र पुरुषा-स्त्री सोबत घडत असल्याचे जाणवते. काही व्यक्ती तर इतर जाती-पतीच्या राष्ट्र पुरुषां संदर्भात तीरस्कार, घृणा, द्वेषाची भावना बाळगतात. थोडक्यात ज्या प्रमाणात माणूस संकुचित होत आहे त्याप्रमाणात राष्ट्रीय व्य्क्तीमत्वांना देखील संकुचित करण्याचा उद्योग करीत आहे.
काही महाभाग या राष्ट्र पुरुषांची उंची( पात्रता, कर्तुत्व, लायकी) मोजण्याचा प्रयन्त देखील करतात. तेच काही महाभाग या राष्ट्र पुरुषात तुलना करण्याचा प्रयन्त करतात. उंची मोजणे असो की तुलना करणे असो याचा आधार काय? तर स्वतःचे अपूर्ण आकलन. ज्याची उंची कमी तोच इतरांची उंची मोजतो. ज्याच्या जवळ पात्रता नाही तोच इतरांची पात्रता मोजतो. थोडक्यात जो अज्ञानी तोच असले विकृत प्रकार करतो मात्र कृती समजतो यातून गल्लत घडते.
वर्तमान समाजात राष्ट्र पुरषांना बंदिस्त करण्यामागे अज्ञान-अहंकार आहे. वर्तमान समाजात अहंकाराचे प्रमाण लक्षणीयरीत्या वाढत आहे यामुळे मानवाच्या प्रत्येक कृती मध्ये अहंकाराची लक्षणे पाहण्यास मिळतात. मालकी हक्क सांगणे असो की परकेपणा अथवा नावाचा आधार घेत शक्तीप्रदर्शन करण्याचा खटाटोप असो की तुलना ते भेदभाव, उच्च-नीच दाखवण्याचा प्रयन्त असो या सगळ्यात अहंकार आहे.
गंमत म्हणजे प्रत्येक जाती धर्मात जे अभासिक ऐक्य आहे त्यासाठी द्वेष, घृणा, तिरस्कार यांची गरज भासते तसेच समूह गोळा करावा लागतो यासाठीच राष्ट्र पुरुषांच्या जयंती व पुण्यतिथी साजऱ्या करण्यात येतात की काय अशी शंका निर्माण होते कारण ज्या राष्ट्र पुरुषांच्या नावाचा ढोल वाजवण्यात येतो त्याच्या पासून प्रेरणा घेत आचरण करण्यात येत नाही याउलट त्याच्या शिकवण विपरीत आचरण करण्यात येत असल्याचे निदर्शनास येत आहे.
थोडे स्वतःचे परीक्षण करून पहा म्हणजे वास्तवाचा प्रत्यय मिळणार आहे. उत्की व कृती यातील अंतर तसेच वास्तव पाहण्यासाठी स्वतःचे परीक्षण करून पहावे. 

Comments

Popular posts from this blog

सरड्याची धाव कुंपणापर्यंत

अंथरूण पाहून पाय पसरणे

पेरावे तसे उगवते