प्रसिद्धीचा हव्यास?


श्री.अरविंद केजरीवाल यांनी सध्या वादग्रस्त विधाने करण्याचा धडाका लावला आहे. त्यांनी या प्रकारची वक्तव्य करण्यामागे प्रसिद्धीचा हव्यास असण्याची शक्यता नाकारता येत नाही. सध्या समाजात वाद निर्माण होणारी वक्तव्य अथवा कृती करून प्रसिद्धी मिळवणे हा प्रकार नवीन नाही.
नेत्यांच्या सभेत चप्पल भिरकावणे, नेत्यांना मारहाण करणे, नेत्यांवर चिखलफेक करणारी भडक वक्तव्य करणे यासारखे प्रकार वाढत आहेत कारण मिडिया या सारख्या घटनांना अवाजवी प्रसिद्धी देते. कृती करणारा माणूस एका क्षणात जगप्रसिद्ध होतो. भिन्न-भिन्न वाहिन्या या घटनेचे सातत्याने प्रक्षेपण करीत राहतात. याठिकाणी कृती करणारा भले बदनाम करण्यात येतो मात्र बदनाम हुवे तो क्या लेकिन नाम तो हुवा.
थोडक्यात माणूस लक्षवेधी वक्तव्य वा कृती करण्यापेक्षा लक्ष वेधणारी कृती करण्यावर भर देण्याचे प्रमाण वाढत आहे. लक्षवेधी आणि लक्ष वेधणारी यामध्ये अंतर आहे. मी स्वतः एक लेखक आहे तसेच मी दहशतवादाचे लक्षवेधाणारे एक पुस्तक लिहिले असून त्याला ‘मी एक दहशतवादी हे नाव दिले हेच मी एखाद्या नेत्याचे नाव घेत .....एक दहशतवादी हे नाव दिले असते तर खूप प्रसिद्धी-खप मिळणार आहे. किंबहुना मी या पुस्तकाचे मुखपृष्ठ फेसबुकवर टाकताच काही मित्रांनी ते थोडे बदल करून वादग्रस्त करण्याचा सल्ला दिला मात्र याकृतीने समाजाचे लक्ष वेधण्यापलीकडे दुसरे काहीच निष्पन्न होणार नाही. माझ्या दृष्टीने लक्षवेध महत्वाचा असून लक्ष वेधणे हे न्युनगंडाचे, अहंकाराचे एक लक्षण आहे.
समाजात माझी दखल घेतली जात नाही याप्रकारचा न्यूनगंड असणारा माणूस इतरांचे लक्ष वेधण्याचा प्रयन्त करतो किंवा अहंकारी माणूस स्वतःच्या अस्तित्वाची दखल इतरांना घेण्यास भाग पडतो यासाठी प्रसंगी वादग्रस्त कृती, वक्तव्य करतो. काही व्यक्ती माकडचाळा करून इतरांचे लक्ष वेधण्याचा प्रयन्त करतात कारण इतरांनी दखल घ्यावी. माणसाचा स्वभाव त्याप्रमाणे प्रसिद्धी मिळवण्याचा मार्ग शोधण्यात येतो.
बऱ्याचदा एखादा व्यक्ती(नेता) त्याचे स्वाभाविक वक्तव्य करतो मात्र मिडिया स्वतःची पोळी भाजण्यासाठी या वक्तव्याचा सोयीस्कर अर्थ घेण्यासाठी तोडमोड ते जोडतोड करून अर्थाचा अनर्थ करीत प्रसिद्धी प्रदान करते. थोडक्यात मिडिया पाराचा कावळा करते. श्री.अण्णा हजारे यांनी एक ही मारा ही स्वाभाविक प्रतिक्रिया दिली अर्थात ती एक उस्फुर्त प्रतिक्रिया होती पण मिडीयाने काय केले? श्री. कपिल सिब्बल यांनी सामाजिक सांकेतिक स्थळावरील स्वैराचार रोखण्या संदर्भात वक्तव्य करताच मिडीयाने सरळ अभिव्यक्ती स्वातंत्र्यवर गदा असा सूर आलाप केला.
श्री.दिग्विजय सिंह यांनी प्रथम टीम अण्णा मागे संघाची भूमिका मांडली त्यावेळी त्याविधानाला वादग्रस्त ठरवण्यात आले. तेच सरसंघचालकांनी स्वतःची भूमिका असल्याचे सांगितले त्यावेळी उलगडा झाला. श्री. केजरीवाल यांचे विधान संदर्भात नेमके काय? प्रसिद्धीचा हव्यास की जनजागरण करण्याचा प्रयन्त? लक्षवेध की लक्ष वेधणारी एक कृती? याठिकाणी ज्या त्या व्यक्तीचा स्वभाव निर्णायक आहे. जशी दृष्टी तशी सृष्टी यानियामाला कोणीही अपवाद नाही. माझ्या दृष्टीने श्री.केजरीवाल यांचे वक्तव्य त्यांच्या दृष्टीचे प्रतिक आहे मात्र दृष्टी कधीही सृष्टीचे समग्र वास्तव नसते. दृष्टी सत्य नसून सत्याचा आभास निर्माण करते. ज्ञानी आभासा मागील वास्तव शोधण्याचा प्रयन्त करतो तेच अज्ञानी आभासाला सत्य मानतो. आपण काय करतो?     

Comments

Popular posts from this blog

सरड्याची धाव कुंपणापर्यंत

पेरावे तसे उगवते

अंथरूण पाहून पाय पसरणे