अक्कल पाजळणे


प्रत्येक मानवाला ज्याची त्याची प्रज्ञा आहे मात्र काही व्यक्तींना स्वतःची प्रज्ञा इतरांपेक्षा जास्त असल्याचा संभ्रम असतो यामुळे या व्यक्ती स्वतःची अक्कल पाजळत फिरतात. मला या प्रकारचा एक व्यक्ती भेटला तसेच त्या व्यक्तीला स्वतःला नाचक्की करून घेण्याची किंमत मोजताना देखील पहिले आहे.
मी मानसिकता व शारीरिक परिणाम या आशयाचे लिखाण करीत असताना एका औषध कंपनीत रिजनल मॅनेजर पदावर कार्यरत असणारा व्यक्ती भेटला. त्यावेळी सदर व्यक्तीने मला मुर्खात काढले कारण तो स्वतः शरीरविज्ञानशास्त्र या विषयातील उच्चशिक्षित होता. मी त्याला माझ्या लिखाणाचा आधार असणारे संदर्भ पुस्तक दाखवण्याचा प्रयन्त केला परंतु भारतीय लेखकाचे नाव पाहताच त्याने पुस्तक विश्वास ठेवण्यास अयोग्य असल्याचा निर्वाळा दिला.
महिनाभराने तेच सदगुहस्थ पुन्हा भेटले. दरम्यान काळात दैनिक पुण्यनगरी मध्ये जसा विचार तसा आजार या मथळ्याखाली परदेशी विद्यापीठाचे संशोधन सुरु असल्यचा तसेच निष्कर्ष घेतल्याचा निर्वाळा देण्यात आला होता. मी ते कात्रण त्याव्याक्तीच्या हातावर ठेवले. त्याक्षणी त्याचा चेहरा पाहण्यासारखा झाला होता. एखाद्याने आपल्या मुस्काडात मारल्या नंतर अपमानित होतो तसा चेहरा होता. तो सदगृहस्थ उठला व बाहेर निघाला. मी त्यांना थांबवले तसेच इथून पुढे कोणत्याही व्यक्तीची विश्वासाहर्ता ही त्याचा जात-पात, धर्म, देश न पाहता निखळ ज्ञान आधारित ठरवण्याचा सल्ला देताना व्यक्तिगत मर्यादा प्रती भान ठेवत वाटचाल करण्याचा अनाहूत सल्ला दिला.
आपण आपल्या आकलन क्षमता नुसार दुसऱ्यांचे परीक्षण करताना स्वतःचे आकलन परिपूर्ण नसल्याचे विस्मरण होते त्याठिकाणी कळत-नकळत स्वतःची अक्कल पाजळण्याचा प्रकार घडतो तसेच प्रसंगी आपण आपल्या आकलन व स्वभावातील त्रूटी इतरांन समोर उघड्या करतो. काही व्यक्तींना पाश्चिमात्य तो योग्य तसेच त्या सापेक्ष इतर अयोग्य असा एक गोड गैरसमज असतो. यांना योग्य व अयोग्य यातील भिन्नता समजते मात्र  त्यामागील अप्रत्याक्षात असणारी एकता समजत नाही.
थोडक्यात जो माणूस एकांगी पाहतो त्यामधून जेकाही एकांगी आकलन करतो त्याला समग्र सत्य मानतो यामुळे प्रसंगी दुसऱ्यांच्या ज्ञानावर प्रश्नचिन्ह निर्माण करतो. गंमत म्हणजे जो स्वतः अज्ञानी असतो तोच इतरांच्या ज्ञानावर प्रश्नचिन्ह निर्माण करतो वर स्वतःचे अज्ञान हेच ज्ञान असल्याचा दावा करतो यामुळेच तो स्वतःची अक्कल पाजळत फिरतो मात्र कळत नकळत स्वतःचे हसे करून घेतो.
वर्तमान समाजात स्वतःची अक्कल पाजळत फिरणाऱ्या व्यक्तींची संख्या लक्षणीय प्रमाणात वाढत आहे यामुळे जोतो दुसऱ्यांनी काय करावे सांगत फिरतो, सल्ले देतो मात्र ज्याला स्वतः काय करतो हेच कळत नाही तो इतरांनी काय करावे हे ठरवण्याचा प्रयन्त करतो. सामजिक सांकेतिक स्थळांना भेट द्या म्हणजे याचा प्रत्यय सहजतेने मिळणार आहे. जो धड स्वतःच्या घराचे अर्थकारण सांभाळण्यास असमर्थ आहे तो देशाच्या अर्थव्यवस्था संदर्भात सुधारणा सांगण्याचा प्रयन्त करतो. जो स्वतःचे घर सांभाळण्यास असमर्थ आहे तो देश कसा सांभाळावा हे ठरवण्याचा प्रयन्त करतो.
आपण स्वतःचे आचरण एकदा प्रामाणिक पणाने तपासून पहावे त्याठिकाणी अक्कल पाजळणारी वृत्ती-प्रवृत्ती आढळते का?

Comments

Popular posts from this blog

सरड्याची धाव कुंपणापर्यंत

अंथरूण पाहून पाय पसरणे

पेरावे तसे उगवते